पश्चिम घाटात सुरू असलेल्या परिस्थितिकीय संशोधनाचा एक भाग म्हणून पश्चिम घाट स्थानिक निर्णय आधार प्रणाली (WGSDSS) ची रचना केली गेली आहे, ज्यामध्ये माहिती आणि मुक्त-स्त्रोत तंत्रजाळातील नवीनतम प्रगतीचा फायदा घेत स्थानिक पातळीवर विकेंद्रीत स्तरावर असलेली वैशिष्ट्यपूर्ण माहिती (जैव, भूगर्भ, हवामान, परिस्थितिकीय , पर्यावरणीय आणि सामाजिक चल) एकत्रित केलेली आहेत. यामुळे सामाजिक गरजा भागविताना प्रशासनातील पारदर्शकता वाढते, ज्यामुळे परिसंस्था आणि जलदृष्टय़ा महत्त्वाच्या सह्याद्री पर्वतरांगांचे विवेकी व्यवस्थापन होण्यास मदत होते. माहितीच्या संश्लेषण आणि एकत्रीकरणाद्वारे विकेंद्रीत स्तरांवर (चौकट/ग्राम) परिस्थितिकीय संवेदनशील प्रदेश दर्शवण्यास मदत होऊन त्याद्वारे सद्यस्थिती समजून घेणे शक्य होते, जे नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी विकेंद्रीत स्तरांवर (उदा. जैवविविधता व्यवस्थापन समिति) प्रभावी निर्णय घेण्यास मदत करते.
तंत्र-जाळ आधारित स्थानिक निर्णय आधार प्रणाली (डब्ल्यूएसडीएसएस) विनामूल्य आणि मुक्त-स्त्रोत सॉफ्टवेअर (GeoServer, PostgreSQL, PostGIS, Leaflet) आणि एकाधिक निकष विश्लेषण करण्यासाठी मुक्त भौगोलिक समूह (ओपन जिओस्पेशियल कन्सोर्टियम) (ओजीसी) मानकांच्या स्थानिक माहितीचे एकत्रीकरण करून डिझाइन केली गेली आहे. वेब मॅप सर्व्हिस (WMS) आणि वेब फीचर सर्व्हिस (WFS) यासारख्या वैशिष्ट्यांमुळे परिस्थितिकीय, सामाजिक, आर्थिक, जैवविविधता आणि पर्यावरणीय माहितीचा प्रभावी प्रसार होण्यास मदत होईल.
परिसंस्थेची संवेदनशीलता किंवा असुरक्षितता म्हणजे एखाद्या प्रदेशाच्या परिसंस्थेचे अखंडत्व आणि अस्तित्वात असलेल्या जीवसृष्टीचे चीरकाल, भरून न येणारे लक्षणीय नुकसान किंवा उत्क्रांतीच्या आणि नवीन प्रजातींमध्ये बदल होऊन नैसर्गिक प्रक्रियेला होणारा धोका होय. एखाद्या प्रदेशाच्या संवर्धनासाठी धोरण विकसित करण्यास त्या क्षेत्राच्या परिसंस्थेच्या संवेदनशीलतेचे व्यापक ज्ञान आवश्यक आहे, ज्यामध्ये भूप्रदेश बदलांसह (Landscape dynamics) परिसंस्थेच्या संवेदनशीलतेसाठी जबाबदार घटक ओळखणे तसेच अव्यवस्थित आणि अनियंत्रित विकास धोरणाच्या समस्या कमी करण्यासाठी भविष्यातील संक्रमणांची कल्पना करणे समाविष्ट आहे. गेल्या शतकात औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणासह अनियोजित विकासात्मक कामांमुळे या प्रदेशात मोठ्या प्रमाणात भूआच्छादन बदल झाले. यासाठी स्थान-विशिष्ट संवर्धन उपायांद्वारे परिणामांचे निराकरण करण्यासाठी भागधारकांचा समावेश असलेल्या शमन उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. संवर्धन आणि शाश्वत विकासात्मक धोरणे तयार करताना जैव-भू-हवामान, परिस्थितिकीय आणि सामाजिक घटकांचे एकत्रीकरण करून परिस्थितिकीय संवेदनशील प्रदेशांचे सीमांकन करणे आवश्यक आहे, जे सामाजिक परिस्थितिकीय प्रणाली, परिणाम आणि प्रेरकाचे प्रतिनिधित्व करतात. कालबाधित दूरस्थ संवेदन महितीचा (Temporal Remote Sensing Data) वापर करून ३६ जागतिक जैवविविधतेच्या हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या पश्चिम घाटातील परिस्थितिकीय संवेदनशील प्रदेशांचे विश्लेषण केल्यास जंगलांची स्थिती आणि संवर्धनाच्या पर्यायांबाबत गंभीर चिंता अधोरेखित केल्या जाते. जंगलतोड आणि त्याद्वारे होणार्या शुद्ध परिसंस्थेचे गैरव्यवस्थापन तसेच वनपरिसंस्थेची सद्यस्थिती यामुळे जलसुरक्षेला धोका निर्माण होऊन द्वीपकल्पीय भारतातील लोकांच्या उपजीविकेसमोर गंभीर आव्हाने निर्माण झालेली आहेत. अवकाशीय कालबाधित (Spatiotemporal) भूप्रयोगाचे विश्लेषण मानव-वंशजन्य विकासात्मक हस्तक्षेप ४.५% अंगभूत आच्छादन (बिल्ट-अप कव्हर) आणि ९% कृषी क्षेत्राच्या वाढीसह ५ % सदाहरित वन क्षेत्र गमावल्याचे अधोरेखित करते. विखंडन विश्लेषण अधोरेखित करते की अंतर्गत जंगल वनक्षेत्र जंगल भूभागाच्या केवळ 25% आहे, जे विखंडन दबावाचा स्थानिक परिस्थितिकीवर होणारा परिणाम दर्शविते. परिस्थितिकीय संवेदनशील प्रक्षेत्र (ईएसआर) रेखांकन अजैविक, जैविक आणि सामाजिक / मानववंश शस्त्र घटकांचा विचार करते, संवेदनशील लँडस्केपची सद्यस्थिती आणि परिसंस्थेचा समतोल राखण्यात त्यांचे महत्त्व प्रतिबिंबित करते. चौकटस्तर निहाय विश्लेषणात ईएसआर-१ अंतर्गत ३२% (७५५ चौकटी) क्षेत्र अत्यंत उच्च परिस्थितिकीय संवेदनशीलता, ईएसआर-२ अंतर्गत १६% (३७३ चौकटी) आहेत, जे ईएसआर1 चौकटस्तर निहाय वर्गात येण्याची क्षमता ठेवते. ३४% (७८९ चौकटी) आणि १८% (४१२ चौकटी) अनुक्रमे ईएसआर-३ आणि ईएसआर-४ मध्ये मध्यम आणि किमान परिस्थितिकीय संवेदनशीलता दर्शविली गेली आहे. परिस्थितिकीय संवेदनशील प्रक्षेत्र (ईएसआर) विश्लेषणात ६३,१४८ चौ.किमी. क्षेत्र अत्यंत उच्च परिस्थितिकीय संवेदनशील आहे, २७६४६ चौ.किमी. उच्च पर्यावरणीय संवेदनशीलतेखाली, ४८,४९० चौ.किमी. मध्यम आणि २०,७१६ चौ.किमी. किमान परिस्थितिकीय संवेदनशील प्रक्षेत्र दर्शविले गेले आहे. शाश्वत विकास धोरणाच्या चौकटीत परिस्थितिकीय संवेदनशील प्रक्षेत्र (ईएसआर) चा समावेश केल्यास अनियोजित विकासात्मक उपक्रमांचे नियमन करण्यास मदत होईल, ज्यामुळे लोकांची उपजीविकेसाठी आवश्यक परिसंस्था सेवा सुरू ठेवून पर्यावरणीय सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल. परिस्थितिकीय संवेदनशील असलेल्या पश्चिम घाटाचे विवेकी व्यवस्थापन करून पुढील पिढीला (आंतरपिढी समता) नैसर्गिक संसाधने (पुरेसे आणि शुद्ध पाणी, ऑक्सिजन इ.) पुरवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे आणि आपण सर्वांनी मिळून आपल्या मुलांसाठी महत्त्वपूर्ण परिसंस्थांचे संवर्धन सुनिश्चित करूया.
अनुवादित:
डॉ. अनघा पाटील आणि धनंजय कुलकर्णी,
Translated by Dr. Anagha Patil and Dhananjay Kulkarni
G.R. Rao |
Field Data Collection Central Western Ghats |
Vishnu D. Mukri | |
Shrikanth Naik | |
Misha | Fauna Distribution |
Sreelekha P.B | Angiosperm Tree Species |
Haritha N | Mapping Biodiversity |
Arjun SR | Protected Areas |
Sincy V | Valuation of Ecosystem Services |
Asulabha KS | |
Rajesh Rana | Western Ghats Villages Rectification |
Abhishek Baghel | Appplication Design & Developer |
E-mail | Sahyadri | ENVIS | GRASS | Energy | CES | CST | CiSTUP | IISc | E-mail |